नीरज चोप्रा ट्रोल   

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तान सोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा भालेफेकपटू नीरज चोप्राला लोकांनी प्रचंड ट्रोल करण्यात आले. नीरज चोप्राने पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीमला भारतात आमंत्रित केल्यामुळे त्याला भारतीयांनी ट्रोल केले. याबाबत खंत व्यक्त करताना नीरज चोप्राने सोशल मीडियावर भलीमोठ पोस्ट लिहिली आहे. माझ्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, हे पाहून वाईट वाटते, असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
एनसी क्लासिक स्पर्धा पुढील महिन्याच्या २४ तारखेला बंगळुरू येथे होणार आहे. भारतात होणार्‍या जागतिक अ‍ॅथलेटिक्स ए-लेव्हल स्पर्धेचे आयोजक म्हणून नीरजने जगभरातील अव्वल भालाफेकपटूंना आमंत्रित करण्याची जबाबदारी स्वीकारली. नीरजने पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या अर्शद नदीमलाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. परंतु, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लोक संतप्त झाले आणि अर्शद नदीमला आमंत्रित केल्याबद्दल नीरजवर टीका होऊ लागली.लोकांनी त्याच्या देशभक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली. याबाबत नीरज चोप्राने खंद व्यक्त केली.
 
नीरजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ’मी सहसा कमी बोलतो, पण याचा अर्थ असा नाही की, मी जे चुकीचे मानतो त्याविरुद्ध बोलणार नाही. विशेषतः जेव्हा माझ्या देशावरील प्रेम आणि माझ्या कुटुंबाच्या सन्मान आणि प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रश्न येतो. गेल्या ४८ तासांत जे काही घडले आहे, त्यानंतर अर्शदच्या एनसी क्लासिकमध्ये उपस्थितीचा प्रश्नच उद्भवत नाही. माझा देश आणि त्याचे हित नेहमीच पहिले असतील. या हल्ल्यांत ज्या लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहेत, त्यांच्यासाठी शोक व्यक्त करतो. 

Related Articles